सुरगाणा: आपल्या सुरगाणा तालुक्यामद्धे भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते . मात्र या वर्षी अवकाळी पाऊसामुळे भात शेतीचे नुकसान हे खूप झाले आहे. शेतकरी यांच्या तोंडातील घास हा अवकाळी पावसाने हिसकावून घेतला आहे. बऱ्याच शेतकरी बांधव यांनी तक्रारी नोंदवल्या नंतर तहसील कार्यालय मधून पंचनामा म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांचे किती नुकसान झाले याची तपासणी करण्याचे आदेश हे तहसील कार्यालय मधून देण्यात आले आहेत.
प्रतेक महसुली गावासाठी एक ग्रामसेवक , तलाठी किंवा कृषि सहायक यांची निवड ही करण्यात आली आहे . तर नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव यांनी आपल्या शेतामधील पिकांची नुकसान झाली असल्यास तात्काळ संबधित अधिकारी यांना कळवून आपल्या नुकसान झाल्याच्या पिकाचा पंचनामा हा करायचा आहे .
पंचनामा अर्ज कसा भरायचा ?
सर्वात आधी तुम्ही आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर सुरगाणा” या केंद्रा वरुण खालील अर्ज नमूना घ्यायचा आहे . हा अर्ज नमूना तुम्हाला खालील प्रमाणे मिळणार आहे.
हा पंचनामा अर्ज आपल्या येथे उपलब्ध आहे . हा अर्ज कसा भरायचा याची माहिती ही तुम्हाला वरती देण्यात आली आहे. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही हा अर्ज आमच्या कडून सुद्धा भरवून घेवू शकता . किंवा तुम्हाला अर्ज भरण्यास मदत ही केली जाईल.
जर तुमचा 7/12 हा सामाईक क्षेत्राचा असेल तर तुम्हाला सहमति पत्र हे जोडावे लागणार आहे . हे सहमति पत्र सुद्धा आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर , सुरगाणा” येथे उपलब्ध आहे . त्याचा नमूना हा तुम्हाला खाली देण्यात आला आहे.
या सहमति पत्रामद्धे तुम्हाला सामाईक खातेदार यांची सहमति घ्यावी लागते . तरच तुम्हाला लाभ हा मिळणार आहे . त्यामुळे सर्व सामाईक खातेदार यांनी नक्की हा अर्ज भरून आपल्या पीक नुकसांनीचा पंचनामा हा करायचा आहे. अधिक माहिती साठी तुम्ही वरील अर्ज वरील संपूर्ण माहिती ही वाचायची आहे .
पंचनामा अर्ज सोबत कोणती कागदपत्रे जोडावी ?
पंचनामा अर्ज सोबत तुम्हाला खालील कागदपत्रे ही जोडायची आहेत . त्याची यादी तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- नुकसान झाल्याच्या फोटो (जिओ टॅग सहित )
- पंचनामा अर्ज
- आवश्यक असल्यास सहमति पत्र (सामाईक क्षेत्र असल्यास )
तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला NOTECAM या प्ले स्टोअर वरील अप्प मध्ये फोटो काढून अर्ज सोबत जमा करायचे आहेत . App Download करण्यासाठी तुम्ही खालील बटण वर क्लिक करू शकता.
NoteCam Liteखालील प्रमाणे तुम्हाला फोटो काढायचे आहेत ..
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला नुकसान भरपाई साठी अर्ज हे करायचे आहेत . अजून सुद्धा शेतकरी बांधव यांना अडचण येत असेल तर जवळच्या कृषि ऑफिस मध्ये किंवा आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर सुरगाणा” येथे भेट देवू शकता .
मित्रांनो अश्याच प्रकरच्या सर्व सरकारी योजना , जॉब अपडेट साठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या हक्काच्या ” गावित ऑनलाइन सेंटर सुरगाणा” येथे एकदा आवश्य भेट द्या .