Pm Kisan New Registration : नमस्कार मित्रांनो , तुम्हाला माहिती आहेच की , प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी यांना वर्षाला रु. ६००० इतके देत असते . तर मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान या योजनेची नवीन नोंदणी करायची असेल तर कशी करावी ? त्या साठी डॉक्युमेंट्स कोणती लागतील याची सविस्तर माहिती येथे आपण पाहणार आहोत.
पीएम किसान नवीन नोंदणी | पीएम किसान योजना स्टेटस चेक करणे | पीएम किसान ekyc करणे याची सविस्तर माहिती येथे तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे . कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होऊन admin सोबत संपर्क करू शकता.
पीएम किसान योजना ओळख
पीएम किसान योजना ही आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी यांच्या साठी आहे . जे शेतकरी बांधव जमीन धारक असतील व ज्या शेतकरी बांधव यांच्या कडे वनजमीन प्रमाणपत्र असेल त्यांना लाभ हा देण्यात येतो . या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरता येतो . त्या साठी भारत सरकारने pmkisan.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे.
या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर भेट देवू शकता . किंवा आपल्या “गावित ऑनलाइन सेंटर” सुरगाणा येथे भेट देवून अर्ज ही करून गहेवू शकता .
कागदपत्रे कोणती लागणार ?
पीएम किसान योजना नवीन नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ उतारा
- बँक पासबूक
- २०१९ पूर्वीच फेरफार
अर्ज कसा करायचा ?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रोसेस करायची आहे.
- सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यायची आहे.
- त्या पुढे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी करायची आहे.
- त्या पुढे आवश्यक ती सर्व माहिती भरून माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे.
- कागदपत्रे ही २००kb असुदया.
- त्या नंतर तुम्हाला तुमचा farmer id लिहून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही पीएम किसान नवीन नोंदणी ही करू शकणार आहात . जर तुम्हाला csc मार्फत नोंदणी करायची असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर भेट देवू शकता. किंवा तुम्ही सुरगाणा तालुक्या मधील असाल तर आपल्या Gavit Online या केंद्रवर भेट देवून आपला ऑनलाइन अर्ज हा करून घ्यायचा आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी योजना माहिती साठी आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा .
1 thought on “Pm Kisan New Registration : पीएम किसान नवीन नोंदणी”