व्हॉटअप्प ग्रुप जॉइन करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Mahadbt Farmer Registration | महा डीबीटी शेतकरी नोंदणी अशी करा .

Mahadbt Farmer Registration
---Advertisement---

Mahadbt Farmer Registration : नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण महाडीबीटी या पोर्टल वरती नवीन शेतकरी नोंदणी करून आपला युजर आयडी आणि पासवर्ड कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.

महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ? कोणत्या पोर्टल वरती नोंदणी करायची ? व कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी आपण महाडीबीटी या पोर्टलची थोडक्यात माहिती खाली टेबल मध्ये समजावून घेऊया.

योजनेचे नावमहाडीबीटी योजना
कुणासाठीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
कोणी सुरू केलीभारत सरकार व महाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
दिल्या जाणारे योजनेची माहितीकृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे व औषधे, फळबाग योजना, आदिवासी बांधवांसाठी विशेष योजना, अशा प्रकारच्या सर्व योजना राबविण्यात येतात
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल बद्दल ओळख

महाडीबीटी हे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पोर्टल आहे. या एकाच पोर्टल वरती महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्व योजनांचे अर्ज हे शेतकऱ्याला करता येतात. या पोर्टलमुळे एकाच शुल्क फी मध्ये शेतकरी हे 40 पेक्षा जास्त योजनांचे अर्ज हे करू शकतात.

महाडीबीटी या पोर्टल वरती ज्या योजनांचे अर्ज तुम्ही करत असतात त्या सर्व योजनांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येते. . त्यामध्ये काही योजना आता मागील त्या शेतकऱ्याला हा देण्यात येतात. जसे की शेततळे हे सर्वांना देण्यात येते. त्याचबरोबर ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या योजनांचे अर्ज सुद्धा आता सर्वांसाठी मंजूर करण्यात येतात.

तर मित्रांनो नक्कीच या पोर्टल वरती तुमची नोंदणी करून घ्यायची आहे व तुम्हाला हव्या असणाऱ्या योजनेचा लाभ हा तुम्ही घ्यायचा आहे.

Mahadbt Farmer Registration Document

महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी शेतकरी यांना खालील डॉक्युमेंट्स लागणार आहेत. 

  1. आधार कार्ड
  2.  आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक
  3.  बँक पासबुक
  4.  सातबारा
  5.  आठ अ उतारा
  6.  पिकांची माहिती
  7.  मोबाईल नंबर
  8.  जीमेल खाते

 वरील माहिती व कागदपत्रे ही तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वरती नवीन शेतकरी नोंदणी करण्यासाठी लागणार आहेत. 

Mahadbt Farmer Registration

महाडीबीटी या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स ह्या वापरायचे आहेत. 

  1. सर्वात आधी तुम्ही महाडीबीटी फार्मर या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे
  2.  त्यानंतर तुम्हाला इथे नवीन शेतकरी नोंदणी असा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे
  3.  येथे तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड तयार करून तुमची नवीन नोंदणी ही करायची आहे
  4.  त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर व जीमेल खाते ओटीपी द्वारे पडताळणी करून घ्यायची आहे
  5.  त्यानंतर तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी व पासवर्ड वापरून तुम्ही लॉगिन करायचे आहे
  6.  त्यानंतर लॉगिन झाल्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवून तुमचा आधार क्रमांक हा पडताळून घ्यायचा आहे
  7.  त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाइल 100% हे पूर्ण करायची आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करा हा ऑप्शन हा दिसणार आहे. 

 तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती Mahadbt Farmer Registration  करू शकणार आहात.  जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता. 

या योजनेची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सुद्धा अधिक माहिती ही मिळवू शकता

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment