Pan Card 2.0 Apply Processes In Marathi : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण पॅन कार्ड 2.0 काय आहे ? व पॅन 2.0 मध्ये आपले जुने पॅन कार्ड कसे बनवायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .
आपल्या भारत देशामध्ये पॅन कार्ड ही 1972 साली पासून बनवणे सुरू झाले . पॅन कार्ड हा एक व्यक्तीला एकदाच मिळत असतो . पॅन क्रमांक वरुण खातेदार यांची आर्थिक व्यवहार इतिहास पाहता येतो .
प्रक्रियेचा टप्पा | सविस्तर माहिती |
---|---|
अर्जासाठी वेबसाइट | income tax 2.0 |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, ( लिंक असलेला मोबाइल ) |
अर्जाचा प्रकार | फॉर्म 49A (भारतीय नागरिकांसाठी) किंवा फॉर्म 49AA (परदेशी नागरिकांसाठी). |
अर्जाचा प्रकार निवडा | नवा पॅन कार्ड किंवा सुधारित पॅन कार्ड (Existing PAN Update). |
ओटीपी प्रमाणीकरण | आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर आवश्यक. |
फी (Processing Fee) | रु . 0 |
फोटो आणि सही अपलोड | आधार कार्ड वरती असलेला फोटो |
पडताळणी (Verification) | सबमिट केलेल्या माहितीसह आधार कार्ड पडताळणी किंवा कागदपत्रांची डिजिटल पडताळणी. |
पॅन कार्ड मिळण्याचा वेळ | ई-पॅन: 2-3 तासात (ईमेलद्वारे), फिजिकल पॅन: 15-20 दिवसांत (पोस्टाद्वारे). |
Pan Card 2.0 Apply Processes In Marathi
पॅन कार्ड 2.0 कसे काढायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे . त्या साथी तुम्ही खालील प्रोसेस ही करायची आहे . त्या साथी सर्वात आधी खालील कागदपत्रे तुम्ही तुमच्या कडे ठेवायची आहेत
लागणारी कागदपत्रे व माहिती
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाइल नंबर
- जीमेल खाते
Pan Card 2.0 Apply
पॅन कार्ड 2.0 काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टल वरती यायचे आहे . ही पोर्टल तुम्हाला खालील प्रमाणे दिसणार आहे .
वरील फोटो मध्ये तुम्हाला इन्स्टंट पॅन (nstant-e-pan ) असा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करायचे आहे . क्लिक केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे विंडो ही दिसणार आहे .
त्या नंतर तुम्हाला ( Get New E-Pan ) या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे . येथे तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे .
येथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे . त्या पुढे तुम्हाला आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या क्रमांका वरती otp येणार आहे . तो otp टाकायचा आहे . पुढे तुमची आधार प्रोफाइल ही दिसणार आहे . येथे तुम्ही तुमचा जीमेल id टाकायचा आहे .
त्या पुढे तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळणार आहे . तो लिहून ठेवा . किंवा तुम्ही त्याची प्रिंट ही काढून ठेवू शकता .
त्या नंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून पॅन कार्ड ही डाउनलोड करू शकता . तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही तुमचे नवीन 2.0 पॅन कार्ड ही तयार करू शकणार आहात . सविस्तर माहिती पाहिजे असल्यास खाली कमेन्ट करा . नक्कीच तुम्हाला मदत ही केली जाईल .
पॅन कार्ड 2.0 संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय?
पॅन कार्ड 2.0 हे पॅन कार्डची सुधारित आवृत्ती आहे, ज्यामध्ये डिजिटल प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान करण्यात आली आहे. ई-पॅन कार्डचा पर्याय यामध्ये उपलब्ध आहे.
2. ई-पॅन कार्ड म्हणजे काय?
ई-पॅन कार्ड हे डिजिटल स्वरूपातील पॅन कार्ड आहे, जे अर्जदाराच्या ईमेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवले जाते. हे वैध असून कागदपत्रांच्या फिजिकल प्रतीची गरज नाही.
3. पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाइल क्रमांक
- जीमेल खाते
4. पॅन कार्ड 2.0 अर्जासाठी किती फी आहे?
- ई-पॅनसाठी : 0 रु
- फिजिकल पॅनसाठी: ₹107
5. अर्ज केल्यानंतर पॅन कार्ड कधी मिळेल?
- ई-पॅन: 2-3 तासांत ईमेलद्वारे मिळते.
- फिजिकल पॅन: अर्ज मंजूर झाल्यानंतर 15-20 दिवसांत पोस्टाद्वारे मिळते.
6. पॅन कार्ड 2.0 साठी आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे का?
होय, ओटीपी प्रमाणीकरणासाठी आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आवश्यक आहे.
7. अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासू शकतो?
तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan/checkStatusDownloadEpan वेबसाइटला भेट द्या
8. ई-पॅन डाउनलोड कसा करायचा?
ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan/checkStatusDownloadEpan वेबसाइटवरआधार क्रमांक आणि OTP टाकून डाउनलोड करता येतो.
9. पॅन कार्डमध्ये सुधारणा (Correction) कशी करता येते?
NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवरून Correction Form भरून आवश्यक ती माहिती अपडेट करता येते.
10. पॅन कार्ड हरवल्यास काय करावे?
पॅन कार्ड हरवल्यास डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा. NSDL/UTIITSL वेबसाइटवरून पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करता येईल.
11. पॅन कार्ड 2.0 साठी वयाची मर्यादा आहे का?
पॅन कार्डसाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही. अल्पवयीनांसाठीही पॅन कार्ड मिळू शकते.
12. पॅन कार्डचे फायदे काय आहेत?
- आर्थिक व्यवहारासाठी ओळखपत्र
- आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी आवश्यक
- बँक खाती उघडण्यासाठी आणि मोठ्या व्यवहारांसाठी आवश्यक
तुमच्याकडे आणखी प्रश्न असल्यास विचारण्यास मोकळ्या मनाने विचारा!