Pik Spardha Rabbi Hangaam Krushi Vibhag : शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पन्न वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार भरघोष बक्षीस देवून प्रोत्साहन देत आहे . त्या साठी शेतकरी यांनी पीक स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे . तर या स्पर्धेची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .
आपल्या महाराष्ट्र राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धा ही राबण्यात येत आहे . सदरची पीक स्पर्धा ही महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत राबवण्यात येते .
तपशील | माहिती |
---|---|
स्पर्धेचे नाव | अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धा (रब्बी हंगाम ) |
स्पर्धा राबवणारा विभाग | महाराष्ट्र शासन, कृषि विभाग |
उद्दिष्ट | उत्कृष्ट पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सन्मान देणे |
भाग घेणारे जिल्हे | महाराष्ट्रातील सर्व जिल्हे |
समाविष्ट पीक | गहू , हरभरा , करडई , जवस |
स्पर्धा प्रकार | तालुका ,जिल्हा व राज्य स्तरावर |
संपर्क अधिकारी | तालुका कृषि अधिकारी / जिल्हा कृषि अधिकारी |
पुरस्कार | प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम |
अर्जाची अंतिम तारीख | ३१ डिसेंबर २०२४ |
पात्रता निकष | महाराष्ट्रातील शेतकरी, संबंधित पिकांचे ठरावीक उत्पादन मापदंड पूर्ण करणे |
अधिकृत वेबसाइट / संपर्क | कृषि विभाग वेबसाइट |
जर अधिक माहिती हवी असेल, तर नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
पीक स्पर्धा (रब्बी हंगाम ) थोडक्यात माहिती
पीक स्पर्धा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तालुका कृषि अधिकारी यांची भेट घ्यायची आहे . येथे तुम्हाला अर्ज हा उपलब्ध असणार आहे . अर्ज व त्या सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे नीट जोडा . याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .
जे शेतकरी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतील त्यांना बक्षीस ही देण्यात येणार आहेत . अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तुमच्या तालुका कृषि अधिकारी यांची भेट घ्यायची आहे .
पीक स्पर्धेसाठी बक्षिसांचे तपशील
पीक स्पर्धेत भाग घेतल्यावर खालील प्रमाणे बक्षीस ही तुम्हाला मिळत असते . आदिवासी शेतकरी व सर्वसाधारण गट असे २ वेगवेगळे गट असतात . त्यामुळे हे बक्षीस आदिवासी यांना अलग व सर्वसाधारण गट यांना अलग देण्यात येते .
स्तर | पहिले बक्षीस | दुसरे बक्षीस | तिसरे बक्षीस |
---|---|---|---|
तालुका पातळी | ₹5,000 | ₹3,000 | ₹2,000 |
जिल्हा पातळी | ₹10,000 | ₹7,000 | ₹5,000 |
राज्य पातळी | ₹50,000 | ₹40,000 | ₹30,000 |
सदर बक्षिसे शेतकऱ्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा उपयोग, व उत्पादन व्यवस्थापनाच्या आधारे दिली जातील.
समाविष्ट पिके
खालील पिकांचा समावेश हा पीक स्पर्धे साठी ठेवण्यात आला आहे .
- ज्वारी
- गहू
- हरभरा
- करडई
- जवस
पीक स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
- विहित नमुना अर्ज
- प्रवेश शुल्क
- सातबारा उतारा (७/१२)
- ८-अ चा उतारा
- आदिवासी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र
- सातबाऱ्यावर घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत नकाशा
- बँक खाते संबंधित कागदपत्रे:
- चेकची प्रत किंवा
- पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
वरील सर्व कागदपत्रे वेळेवर सादर करणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील सहभागासाठी अधिक माहिती नजीकच्या कृषि कार्यालयात संपर्क साधावा.
पीक स्पर्धेसाठी पात्रतेचे निकष
निकष | तपशील |
---|---|
प्रवेश शुल्क (प्रत्येक पिकासाठी) | सर्वसाधारण गट: ₹300 आदिवासी गट: ₹150 |
जमिनीचा प्रकार | स्वतःची जमीन असणे व स्वतः कसत असणे अनिवार्य |
स्पर्धेसाठी पिके | एकापेक्षा अधिक पिकांसाठी सहभाग मान्य |
वरील पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होता येईल.