शेतकरी ओळखपत्र कसे काढावे ? | Farmer Id Card Kase Kadhave

Farmer Id Card Kase Kadhave

Farmer Id Card Kase Kadhave : संपूर्ण भारत देशामध्ये शेतकरी ओळखपत्र कार्ड काढणे सुरू झालेले आहे. तर आपण या लेखांमध्ये हे कार्ड कोणी काढायचे ? त्याचे फायदे काय आहेत ? कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

शेतकरी ओळखपत्र कसे काढावे ? | Farmer Id Card Kase Kadhave | mhfr.agristack.gov.in ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शेतकरी ओळखपत्र थोडक्यात माहिती

आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी यांना पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना कर्ज मिळत आहे. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत बियाणे अनुदान किंवा इतर महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. या योजना राबवताना अधिक सोपे जावे म्हणून महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने फार्मर आयडी कार्ड सुरू केलेले आहे.

Farmer ID Card ची माहिती थोडक्यात

घटकमाहिती
नावFarmer ID Card (शेतकरी ओळखपत्र)
उद्देशशेतकऱ्यांना विविध सरकारी योजना व सबसिडीचा लाभ देण्यासाठी ओळख प्रदान करणे
जारी करणारा विभागकृषी विभाग / राज्य व केंद्र सरकार
आवश्यकताशेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे आणि त्यांना तात्काळ योजना-लाभ पोहोचवणे
योग्यताज्या व्यक्तींकडे शेतीसाठी जमीन आहे किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करतात
मुख्य लाभ– सरकारी योजनांचा थेट लाभ – सबसिडी आणि आर्थिक सहाय्य – ओळख प्रमाणपत्र
दस्तावेज आवश्यकआधार कार्ड, 7/12 उतारा, पॅन कार्ड (गरजेनुसार)
प्रक्रियाऑनलाईन अर्ज करणे
अर्ज पद्धतऑनलाईन/ऑफलाईन (राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध)
फी (शुल्क)बहुतेक राज्यांत विनामूल्य, काही ठिकाणी नाममात्र शुल्क लागू शकते
महत्त्वशेतकऱ्यांना त्यांची ओळख स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारी लाभ मिळवण्यासाठी उपयोग
अधिक माहितीस्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रकारची कागदपत्रे ही लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला असल्यास
  • आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर

वरील कागदपत्रे ही तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी लागणार आहेत.

Farmer Id Card Online Apply

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रकारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही वरील यादीमध्ये दिलेली डॉक्युमेंट सोबत घेऊन जवळच्या सीएससी सेंटर वरती जायचे आहे.

त्यानंतर तुम्ही तेथे तुमच्या आधार क्रमांकाची ओटीपी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने वेरिफिकेशन करून तुमचा रेफरन्स नंबर किंवा आलेली पोचपावती डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला अर्ज करून पाहिजे असतील तर तुम्ही खालील क्रमांकावर ती संपर्क साधा नक्कीच तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढून दिले जाईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनांच्या अपडेट साठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा येथे तुम्ही व्हाट्सअप वरती कॉन्टॅक्ट करून तुमची सर्व ऑनलाईन ची कामे ही करून घेऊ शकता.

2 thoughts on “शेतकरी ओळखपत्र कसे काढावे ? | Farmer Id Card Kase Kadhave

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *