सुरगाणा (ता.प्र.): दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना आवश्यक त्या साहित्याचा आधार मिळावा या हेतूने पंचायत समिती सुरगाणा येथे दिनांक १४ जुलै २०२५ रोजी, सोमवार, सकाळी ११ वाजता दिव्यांगांना मोफत सहाय्यवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार भास्कर भगरे सर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात सुरगाणा तालुक्यातील विविध प्रकारच्या दिव्यांग – जसे की दृष्टिहीन (आंधळे), अपंग (पांगळे), ऐकू न येणारे (बहिरे), तसेच चालता न येणारे किंवा मणक्याचे गंभीर त्रास असणारे नागरिक यांना आवश्यक त्या सहाय्यवस्तू मोफत दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या गावातील दिव्यांग बांधवांची यादी तयार करून, त्यांना सोमवार दिनांक १४ जुलै रोजी पंचायत समिती, सुरगाणा येथे वेळेत घेऊन यावे.
दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगण्यासाठी आधार देणारे असे हे पाऊल, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा व आपल्या छोट्याशा मदतीने एखाद्याच्या आयुष्यात मोठा फरक निर्माण करावा.
