Pm Kisan Yojana Status :- नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज ज्या लोकांनी केलेली आहेत त्यांचा अर्ज मंजूर आहे की तपासणी अंतर्गत आहे हे कसे तपासायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
पी एम किसान योजना स्टेटस चेक करणे | पी एम किसान योजनेअंतर्गत केलेल्या अर्ज मंजूर झालेला आहे की नाही याची माहिती आपण कशी पाहायची आपल्या मोबाईलवरून याची सविस्तर माहिती उपलब्ध.
पी एम किसान योजना थोडक्यात माहिती
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी यांना प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला एकूण सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात येतात.
योजना | पीएम किसन योजना |
नवीन नोंदणी लिंक | येथे क्लिक करा |
स्टेटस चेक करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
लाभ | वर्षाला रु. ६००० |
तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी यांना ऑनलाइन पद्धतीने आपली नोंदणी ही करावी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कृषी कार्यालय मध्ये तुमचे अर्जाची तपासणी होते त्यानंतर अर्ज हा मंजूर केला जातो.
पी एम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे
पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही पीएम किसान या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला नो युवर स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचे स्टेटस हे पाहू शकता.
जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची ई केवायसी ही करायची आहे.
अर्ज हा कोणत्या कारणाने रिजेक्ट झाला असेल तर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही सीएससी मार्फत पुन्हा अर्ज हा करू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस हे तपासून शकणार आहात. जर तुम्हाला स्टेटस तपासत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला मदत ही करण्यात येईल.
पी एम किसान योजना केवायसी कशी करायची
पी एम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर भेट देऊ शकता.
जर तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही पी एम किसान केवायसी ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता.
जर तुम्हाला तुमचे पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधून तुमचे स्टेटस चेक करून घेऊ शकता. किंवा आपल्या गावित ऑनलाईन सेंटर येथे भेट देऊन तुम्ही अधिक माहिती ही मिळवू शकता.
पी एम किसान योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती ही मिळवू शकता.